GRAMIN SEARCH BANNER

नेत्रावती, मत्स्यगंधा एक्स्प्रेस ३० जानेवारीपर्यंत पनवेलपर्यंतच धावणार

Gramin Varta
57 Views

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेस आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या प्रवासात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या दोन्ही गाड्या मुंबई (एलटीटी) ऐवजी त्या पनवेल स्थानकापर्यंतच धावणार आहेत.

तसेच या गाड्या पनवेलहूनच सुटणार आहेत. हा बदल ३० जानेवारी २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

एलटीटी यार्डमधील दुरुस्ती व देखभालीसाठी रेल्वे प्रशासनाने हा बदल गेला आहे. या कालावधीत कोणतीही गाडी एलटीटीपर्यंत जाणार नाही किंवा त्थून सुटणार नाही.

पनवेलपर्यंत धावणाऱ्या गाड्या :

गाडी क्र. 12620 – मंगळुरू सेंट्रल – मुंबई (एलटीटी) मत्स्यगंधा एक्सप्रेस

गाडी क्र. 16346 – तिरुवनंतपुरम सेंट्रल – मुंबई (एलटीटी) नेत्रावती एक्सप्रेस

पनवेलवरून सुटणाऱ्या गाड्या :

गाडी क्र. 12619 – मुंबई (एलटीटी) – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस

गाडी क्र. 16345 – मुंबई (एलटीटी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस

या बदलामुळे ठाणे आणि कुर्ला (एलटीटी) स्थानकांदरम्यानचा प्रवास रद्द राहणार आहे.

Total Visitor Counter

3366895
Share This Article