GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत मराठी बालनाट्य दिवस साजरा

रत्नागिरी : बालरंगभूमी परिषद शाखा रत्नागिरीतर्फे  2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मराठी बालनाट्य दिवस साजरा करण्यात आला.

प्रथमतः दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मोटे, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्यवाह समीर इंदुलकर यांच्या हस्ते नटराज पूजन आणि कै. रत्नाकर मतकरी, कै. सुधा करमरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सर्व निमंत्रित पाहुण्यांना गुलाबपुष्प आणि बालकवी लिखित काव्यसंग्रह भेट देण्यात आला.

कार्यक्रमाला बालरंगभूमी परिषद शाखा रत्नागिरीचे अध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, कार्यवाह सीमा कदम, कोषाध्यक्ष शौकत गोलंदाज, कार्यकारिणी सदस्य तेजस्विनी जोशी, सल्लागार राजकिरण दळी, सभासद आणि युथ टीम सदस्य शहाबाज गोलंदाज, सागर सकपाळ, योगेश कदम, निरंजन सागवेकर, सई कदम उपस्थित होते.

उद्घाटनानंतर योगेश कदम लिखित आणि शहाबाज गोलंदाज दिग्दर्शित ‘धोंड’ या बालनाट्याचे अभिवाचन करण्यात आले. यामध्ये  अर्षती कारेकर, स्वरा कदम, ईशा चव्हाण, श्रेया गंधारे, सोहम कदम, श्रवण महाले, गंधार संसारे, श्रेया दसुरकर, अनन्या देवस्थळी आणि गार्गी या बालकलाकारांनी सहभाग घेतला. या सर्व बालकलाकारांना शाखेतर्फे काव्यसंग्रह देऊन गौरविण्यात आले.

Total Visitor Counter

2455558
Share This Article