GRAMIN SEARCH BANNER

खेड एसटी आगाराला चिपळूण अर्बन बँकेने दिले मार्गफलक

खेड: एसटीच्या खेड आगाराला चिपळूण अर्बन बँकेने विविध मार्गांवर धावणाऱ्या एसटी बससाठी मार्गफलक तयार करून दिले.

खेड आगार व्यवस्थापक राजेशिर्के यांच्याकडे फलकांचे औपचारिक हस्तांतर करण्यात आले.

यावेळी रोटरी स्कूलचे अध्यक्ष बिपिनशेठ पाटणे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे व शिवचैतन्य पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंदशेठ तोडकरी, चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, उपाध्यक्ष रहिमान दलवाई, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सतीश अप्पा खेडेकर, संचालक ॲड. दिलीप दळी, रत्नदीप देवळेकर, शाखाधिकारी स्वप्नील जाधव, तसेच एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

खेड आगाराच्या गरजा ओळखून सामाजिक भानातून या उपक्रमात सहकार्य केल्याबद्दल राजेशिर्के यांनी चिपळूण अर्बन बँकेचे आभार मानले. या उपक्रमामुळे प्रवाशांना सुविधा मिळून एसटी सेवा अधिक सुकर होणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Total Visitor Counter

2455614
Share This Article