GRAMIN SEARCH BANNER

खेडशी येथे दुचाकीची ॲपे-टेम्पोला धडक; कापडगाव येथील तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Gramin Varta
1.3k Views

रत्नागिरी : खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळ राधाकृष्ण ग्रेनाईडसमोर मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या अॅक्सेस दुचाकीने रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा-टेम्पोला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेले दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. तिघेही कपडगाव येथील असून ऍक्सेस दुचाकीवरून 3 सीट चालले होते.

निवळी येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी रिक्षा-टेम्पो (एमएच ०८ बीसी १२७९) रात्री सुमारे ९.२० वाजता खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळून जात असताना समोरून येणाऱ्या अॅक्सेस दुचाकीने (एमएच ०८ एडब्ल्यू १६६२) तिला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका तीव्र होता की परिसरात एकच खळबळ उडाली.

या अपघातात दुचाकी चालवणारा राज सुधाकर कोत्रे (वय १९, रा. कापडगाव) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आर्यन विनोद कुरतडकर (१९) आणि पार्थ विजय कुरतडकर (19,तिघे राहणार कापडगाव, रत्नागरी) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या मार्गावर वारंवार अपघात होत असूनही वेगावर नियंत्रण नसणे, रात्रीच्या वेळी वाहनचालकांचा निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन यामुळे जीवघेणे प्रकार घडत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3210817
Share This Article