संगमेश्वर : पाणी बिल अपहार प्रकरणी घोडवली ग्रामपंचायत सदस्य अपात्र

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

संगमेश्वर : पाणी बिलाच्या अपहारप्रकरणी संगमेश्वर तालुक्यातील घोडवली ग्रामपंचायतीचे तत्कालीन पाणी समिती अध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय सखाराम मेस्त्री यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने दिला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घोडवली ग्रामपंचायतीच्या सरपंच वैदेही बने यांना कळविण्यात आले आहेत.

सन २०१८ मध्ये विजय मेस्त्रा हे घोडीवली-चांदिवणे ग्रामपंचायतीचे पाणी समिती अध्यक्ष होते. या कालावधीत त्यांनी पाणी बिलाच्या नावाखाली सेल्फ चेकद्वारे ३२ हजार २४५ रुपये इतकी रक्कम काढून त्याचा गैरवापर केल्याची तक्रार सरपंच वैदेही वैभव बने यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहारही करण्यात आला होता.

या प्रकरणी सविस्तर सुनावणी घेऊन सर्व पुरावे तपासल्यानंतर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या न्यायालयाने विजय मेस्त्रा यांना अपात्र ठरवण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १४ (ग) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
जनतेचा पैसा हा वैयक्तिक मालमत्तेसारखा वापरणाऱ्यांना या निर्णयामुळे स्पष्ट इशारा मिळाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *