GRAMIN SEARCH BANNER

मुंबई गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात तरुण जखमी

Gramin Varta
291 Views

खेड : मुंबई–गोवा महामार्गावरील भरणे–जाधववाडीनजीक सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दुचाकी अपघाताची घटना घडली. या अपघातात गणेश प्रकाश जाधव (वय ३०, रा. शिरवली) हा तरुण किरकोळ जखमी झाला आहे.

खेडहून शिरवलीच्या दिशेने जात असताना गणेश जाधव यांच्या दुचाकीचे (क्रमांक MH-08 BF 8603) अचानक नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी गणेश जाधव यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Total Visitor Counter

3377042
Share This Article