रत्नागिरी : येथील जी.जी. पी.एस. च्या ‘स्वामी स्वरूपानंद प्री-प्रायमरी’ विभागात नवरात्रीनिमित्त पालकांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
‘नवरात्री’ हा विषय घेऊन पालकांनी विविधरंगी, आकर्षक आणि कलात्मक रांगोळ्या साकारल्या. या रांगोळ्यांतून देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडले. पावसाच्या व्यत्ययातही पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे परीक्षण सौ. वृषाली भूषण दळी आणि सौ. शमिका पारकर यांनी केले. सर्व रांगोळ्या इतक्या सुंदर होत्या की, प्रत्येक रांगोळी बक्षिसास पात्र असल्याचे परीक्षकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. अपूर्वा मुरकर, प्री-प्रायमरी विभाग प्रमुख सौ. शुभदा पटवर्धन तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
रत्नागिरी : जी.जी. पी.एस. च्या ‘स्वामी स्वरूपानंद प्री-प्रायमरी’ विभागात पालकांसाठी रांगोळी स्पर्धा
