दापोली : दाभोळ येथे येत्या शनिवारी (दि. २६ जुलै) मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
तपासणीसाठी डेरवण येथील भक्तश्रेष्ठ वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक येणार आहे, मोतिबिंदू, मुतखडा, अँजियोप्लास्टी, बायपास, गुडघे बदलणे यांसारख्या अनेक शस्त्रक्रिया मोफत होण्यासाठी तपासणी आणि नोंदणी केली जाईल.
त्याशिवाय अन्य शस्त्रक्रिया अल्पदरात करता येतील.
दाभोळ येथील सागरपुत्र प्रतिष्ठान सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणार असलेल्या या शिबिराचा लाभ परिसरातील अधिकाधिक गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन शिबिराचे आयोजक मिहिर दीपक महाजन यांनी केले आहे.
दाभोळ येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर
