GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात विद्यार्थ्यांचे तब्बल तीन तास एसटी रोको आंदोलन

Gramin Varta
279 Views

राजापूर : ओझर येथील संतप्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ३ तास एसटी रोको आंदोलन केले.

राजापुरातून सकाळी 6.00 वाजता सुटणाऱ्या राजापूर – ओझर गाडीने 7:30 च्या कॉलेजच्या मुलांना ओणी व राजापूरला जाता येत होते.गेली अनेक वर्षे चालू असणारी गाडी अचानक बंद करून येरडव-राजापूर गाडी ओझर मार्गे सुरू केली. ही गाडी 8:10 ला ओझरला येते. त्यामुळे मुलांना 7:30 च्या कॉलेजला जायला उशीर होतो. सुमारे 25 पासधारक विद्यार्थी या गाडीवर अवलंबून आहेत. त्यांचे सुमारे दोन तास वाया जाऊन शैक्षणिक नुकसान होते.

याबाबत ओझर ग्रामपंचायतीने आणि नूतन वि‌द्यामंदिराने वारंवार पत्रव्यवहार करूनही याबाबत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे पासधारक विद्यार्थ्यांनी आज ओझर येथे एसटी बस रोको आंदोलन केले.

या आंदोलनाची फारशी दखल एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी घेतली नाही. कोणतीही सुधारणा करण्याचे पत्र न देता, फक्त आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील, अशा आशयाचे पत्र दिले. परंतु विद्यार्थी व पालकांची अशी मागणी आहे की, पूर्वीप्रमाणे सकाळी 6:00 वाजता सुटणारी राजापुर – ओझर अशी फेरी सुरू करण्यात यावी. ती सकाळी 6:45 ओझरला पोहोचल्यावर विद्यार्थ्यांना 7:30 च्या कॉलेजला वेळेत जाता येईल.

Total Visitor Counter

3367463
Share This Article