रत्नागिरी: येथील नित्या प्राणिक हिलिंग सेंटरच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्राणिक शेतीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या विशेष कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून अहमदाबाद येथील डॉ. विशाल पटेल उपस्थित होते. त्यांना प्राणिक हिलिंगचा १५ वर्षे व प्राणिक शेतीचा १२ वर्षांचा अनुभव आहे. नित्या प्राणिक हिलिंग सेंटरचे प्रमुख तेजस महागावकर यांनी डॉ. पटेल यांचे स्वागत केले.
प्रशिक्षक डॉ. विशाल पटेल यांनी प्राणिक शेतीवर विशेष मार्गदर्शन केले. प्राणिक शेतीवरील त्यांचे अनुभव कथन केला. या विशेष कार्यक्रमाला नित्या प्राणिक हिलिंग सेंटरचे प्रमुख तेजस महागावकर, शेतकरी,आंबा, काजू बागायतदार उपस्थित होते. रत्नागिरीतील नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
येत्या २५ व २६ जून २०२५ रोजी बेसिक प्राणिक हिलिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नित्या प्राणिक हिलिंग सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.
रत्नागिरी : नित्या प्राणिक हिलिंग सेंटरच्या प्राणिक शेतीवरील विशेष कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
