GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी पंचायत समिती सभापतीपदी प्रवीण पांचाळ, तर उपसभापती गजानन धनावडे बिनविरोध

रत्नागिरी : पंचायत समितीमध्ये करबुडे गणाचे शिवसेनेचे सदस्य प्रवीण पांचाळ यांची सभापतीपदी, तर कुवारबाव गणातून विजयी झालेले गजानन धनावडे यांची उपसभापती बिनविरोध निवड झाली. शिवसेनेमध्ये गेली अनेक वर्ष समाजकारण करणाऱ्या प्रवीण पांचाळ यांनी करबुडे गटामध्ये चांगले मताधिक्क्य घेतले. उपसभापतीपदी निवड झालेले गजानन धनावडे यांनी कधीही पदांची अपेक्षा ठेवली नव्हती. ते कुवारबाव गणातून विजयी झाले. उपसभापती झाल्यावर श्री. धनावडे यांनी आपण या पदावर बसू असेही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.जिल्हा परिषदेच्या आवारातील स्व. शामराव पेजे सभागृहामध्ये पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड प्रक्रिया झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी जीवन देसाई, सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी शेळके यांनी काम पाहिले. निवड झाल्यानंतर आज सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सभापती आणि उपसभापती यांनी पदभार स्वीकारला.

Total Visitor Counter

3485608
Share This Article