दापोली: दापोली पोलिसांनी समुद्रकिनारी सापडलेल्या अमली पदार्थ प्रकरणी कारवाईचा वेग कायम ठेवत तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर 2025 रोजी केळशी समुद्रकिनारी अज्ञात अमली पदार्थ सापडल्याने गुन्हा क्र. 143/25 अंतर्गत NDPS कायद्यान्वये चौकशी सुरू होती. यापूर्वी अखिल होडेकर (वय 49) आणि अब्रार डायरी (वय 32), दोघेही केळशी किनारा मोहल्ला येथील रहिवासी, यांना अटक करण्यात आली होती.
चौकशीतून उघड झाले की, या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अखिल अब्बास होडेकर (वय 49, रा. केळशी उंबरशेत) चरस विक्री प्रकरणात सहभागी असून, त्याने अब्रार डायरी याला मदत केली होती. त्या आधारावर पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांचे आवाहन: समुद्रकिनारी कुठल्याही संशयास्पद हालचाली, पॅकेट्स किंवा वस्तू दिसल्यास त्वरित दापोली पोलिसांना कळवा. तुमची माहिती गुप्त ठेवली जाईल.
दापोली पोलिसांच्या दक्षतेमुळे या प्रकरणात सलग तिसरी अटक झाली असून, अमली पदार्थविरोधी मोहिमेला यश मिळत आहे.
दापोली : अमली पदार्थ प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक
