GRAMIN SEARCH BANNER

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत राजापूरच्या खेळाडूंचे घवघवीत यश; पूर्वा राऊतला रौप्य, गौरव धालवलकरला कांस्यपदक

Gramin Varta
143 Views

राजापूर : लातूर येथील औसा रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात ५ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन व लातूर तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३५वी राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा २०२५–२६ तसेच ११वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुमसे स्पर्धा नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत तायक्वांदो अकॅडमी राजापूरच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवत आपली छाप पाडली.

या राज्यस्तरीय स्पर्धेत तायक्वांदो अकॅडमी राजापूरच्या तीन खेळाडूंनी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. सध्या पुणे येथे शिक्षण घेत असलेली कु. पूर्वा संदीप राऊत हिने ५३ किलोखालील वजनगटात उत्कृष्ट खेळ करत रौप्यपदक पटकावले. तसेच रिचा संजय मांडवकर हिने वरिष्ठ गटातील पुमसे स्पर्धेत सहभाग नोंदवून आपली चमक दाखवली. आबासाहेब मराठे सीनिअर कॉलेज, हातीवले येथे शिक्षण घेत असलेल्या कु. गौरव दीपक धालवलकर याने ७४ किलोखालील वजनगटात कांस्यपदक पटकावून राजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

हे तिन्ही खेळाडू गेले सहा वर्षे राजापूर शहरातील मध्यवर्ती भागातील धर्मशाळा मारुती मंदिर येथे असलेल्या तायक्वांदो अकॅडमी राजापूर या प्रशिक्षण केंद्रात सराव करत आहेत. त्यांना तालुका प्रशिक्षक श्री. मुकेश शांताराम नाचरे यांच्यासह सौ. मधुरा नाचरे, श्रुतिका मांडवकर व अंश गुंड्ये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

या यशाबद्दल महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम, तसेच सदस्य अजित गार्गे, नीरज बोरसे व सतीश खेमसकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. यासह जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा व कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनीही शुभेच्छा दिल्या.

तायक्वांदो अकॅडमी राजापूरचे अध्यक्ष श्री. अभिजित जनार्दन तेली, उपाध्यक्ष श्री. मुकेश मयेकर, खजिनदार श्री. संजय मांडवकर तसेच सदस्य श्री. दीपक धालवलकर, श्री. संदीप राऊत, श्री. प्रसाद शिवलकर, सौ. मानसी दिवटे, सौ. दीपिका पवार, श्री. अद्वैत अभ्यंकर व श्री. निलेश रहाटे यांनीही सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी समस्त पालकवर्गानेही खेळाडूंचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.

Total Visitor Counter

3072294
Share This Article