GRAMIN SEARCH BANNER

देवरुखातील सोने व्यापारी अपहरण प्रकरण; नदीतून पिस्तूल शोधणाऱ्यांचा सत्कार

Gramin Varta
798 Views

रत्नागिरी : सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरणप्रकरणात तपासाची मोठी कळी उघड झाली आहे. आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार अपहरणासाठी वापरलेली पिस्तूल मुचकुंदी नदीत फेकण्यात आली होती. शनिवारी दुपारी पोलिसांनी नदीत शोधमोहीम राबवून ही पिस्तूल हस्तगत केली.

केतकर यांचे 17 सप्टेंबर रोजी वांझोळे येथे अपहरण करण्यात आले होते. रोख रक्कम आणि दागिने काढून घेतल्यानंतर त्यांना इर्टिगा गाडीत डोक्यावर आवरण घालून बसवण्यात आले व रात्री उशिरा वाटूळ परिसरात सोडण्यात आले. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि देवाखातील निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली तपासाचा वेग वाढला.

या प्रकरणात सागर कदमसह आठ आरोपींना अटक झाली आहे. जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर सागर कदमने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. चौकशीत त्याने पिस्तूल मुचकुंदी नदीत टाकल्याची माहिती दिली.

या संकेतावर पोलिस पथक शनिवारी मुचकुंदी नदीवर दाखल झाले. पाण्यात शोध घेणे कठीण असले तरी देवाखातील देवानंद आणि संजय गजबार यांनी नदीत उतरून तब्बल दोन तास शोधमोहीम चालवली आणि अखेर गाळात लपलेली पिस्तूल सापडली.

सागर कदमने पंनित दुधाणे आणि राजेश नवाले यांच्या मदतीने ही पिस्तूल नांदेड येथून विकत घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या व्यवहारामागील इतर धागेदोरे तपासले जात आहेत. पिस्तूल शोधण्यात मदत करणाऱ्या दोन्ही तरुणांचा देवाखा पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला.

Total Visitor Counter

3375824
Share This Article