GRAMIN SEARCH BANNER

जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही निदा खानला अटक नाही, पोलीस पथके शोधात

Gramin Varta
70 Views

नाशिक : टीसीएस कंपनी मधील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी निदाखान अजूनही पोलिसांच्या तावडीमध्ये आली नसून तिने आजही पोलिसांना गुंगारा दिला आहे . त्यामुळे तिला अटक होऊ शकलेली नाही.

मार्च महिन्याच्या 23 तारखेला नाशिक मधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनी महिला कर्मचाऱ्यांचा बळजबरीने धर्मांतर आणि लैंगिक शोषण झाल्याची घटना पुढे आली होती या ठिकाणी काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांचे बळजबरीने धर्मांतरण करण्यात येत असल्याचे प्रकरण समोर आले होते याबाबत देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाणे मध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत या गुन्हाचा तपास करत असताना पोलिसांनी आत्तापर्यंत यात तौसिफ बिलाल अत्तार (वय ३७), दानिश एजाज शेख (वय ३२), शाहरुख हुसेन शौकत कुरेशी (वय ३४) आणि रझा रफीक मेमन (वय ३५). या आरोपींना अटक केलेली आहे. या आरोपींना काही काळ पोलीस कोठडी मिळाली होती नंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती पोलिसांनी न्यायालयात पुन्हा एकदा अर्ज करून या सर्व आरोपींना ताब्यामध्ये घेतले आणि त्यांना चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळालेली आहे त्यांची पोलीस कोठडी चौकशी सुरू आहे.

तर या आरोपींमध्ये काही आरोपींचे लॅपटॉप आणि मोबाईल फोन यांच्या डाटा रिकव्हर करण्यात आला आहे त्यात डाटामध्ये मिळालेल्या माहितीनुसार इतर आयटी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील यामध्ये सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून त्या दृष्टिकोनातूनही पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे तर या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांकडून अजून काही माहिती गोळा केली जात आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये फरार असलेली आयटी कंपनीतील निदाखान ही फरार होती मागील 40 दिवसापासून फरार असलेल्या निदाने नाशिक रोड न्यायालयात एडवोकेट राहुल कासलीवाल यांच्यामार्फत जामिन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावरती न्यायालयात तीन वेळा सुनावणी होऊन अखेर काल शनिवारी दोन मे रोजी न्यायालयाने निदा खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. नंतर पोलीस तिच्या मागावर ती आहेत अजून पर्यंत ती पोलिसांना सापडली नाही वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे ती लवकरच पोलिसांना सापडेल असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला असून ती पोलिसांच्या दृष्टी शेतामध्ये असून कोणत्याही क्षणी तिला अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ती अजून पर्यंत सापडली नाही त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीप्रमाणे तिला शोधून अटक करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर निदाखान प्रेग्निडेट असून त्यामुळे काही अडचणी येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3355407
Share This Article