GRAMIN SEARCH BANNER

लांजा : चोरीच्या उद्देशाने फिरणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Gramin Varta
265 Views

लांजा (प्रतिनिधी): लांजा पोलिसांना गस्त घालत असताना वेरळ येथील साई मंदिराच्या परिसरात एक संशयित व्यक्ती आढळून आली. ही व्यक्ती पोलिसांच्या अभिलेखावरील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती समोर आली असून, ती पुन्हा एकदा चोरीच्या उद्देशाने परिसरात फिरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लांजा पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेले पोलीस कॉन्स्टेबल विकास सोपान पवार हे दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास वेरळ साई मंदिर परिसरात गस्त घालत होते.

त्यावेळी त्यांना एक व्यक्ती संशयीतपणे भटकताना दिसली. पोलिसांनी थांबवून तिची चौकशी केली असता, ती व्यक्ती लांजा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मंगेश मनोहर पत्याने (वय ३७, रा. पुनस कोंड, ता. लांजा) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3388101
Share This Article