मुंबई: राज्य सरकारच्या परिपत्रका नुसार रायगड जिल्ह्यातील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. या निर्णयामुळे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या पदरी निराशा आली आहे.
काही महिन्यांपासून रायगड चे पालकमंत्री पदाचा वाद चांगला रंगला असून पालकमंत्री पद मिळावे यासाठी शिवसेनेतर्फे रस्त्यावर आंदोलन करण्यात आले होते.
ध्वजारोहण यादी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मंत्री सावंत यांनी स्पष्ट केले की सध्या जाहीर झालेली यादी ही फक्त ध्वजारोहणासाठी असून ती पालकमंत्री पदाची नाही. तसेच भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावे यासाठी ते आग्रही असल्याचे त्यांनी नमूद केले. तर राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावली जात आहेत.