संगमेश्वर/दिनेश अंब्रे: संगमेश्वर येथील रामपेठ (नावडी) अंगणवाडीत बालविकास प्रकल्प अधिकारी मा. श्री विनोदकुमार शिंदे (देवरूख) यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. ह्यावेळी नावडी उपसरपंच मा. श्री विवेक शेरे, ग्रामविकास अधिकारी मा. श्री संजय शेलार, नावडी बीट सुपरवायजर सौ. आर आर प्रभुघाटे आदी उपस्थित होते.
सेविका सौ. पल्लवी सचिन शेरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले रामपेठ अंगणवाडी ही विविध बालकल्याण उपयोगी उपक्रम राबवण्यात अग्रगण्य आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, महिला कल्याण, आरोग्य तपासणी, पोषण आहार इ. क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यामुळे उपक्रमशील अंगणवाडी म्हणून नेहमीच विविध अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली आहे.
2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून येथील अंगणवाडी सेविका सौ. पल्लवी सचिन शेरे यांनी संगमेश्वर बोरीबंदर
( आठवडा बाजार) येथे नवरात्र निमित्त संपन्न झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत “स्वच्छता थीम” चे सादरीकरण केले. I.C.D.S पोषण अभियान, स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान अंतर्गत स्वच्छ जागृती मिशन जनजागृती मोहिमेचे महत्व समाजासमोर आपल्या अभिनयातून लोकांसमोर पटवून दिले.. व तिसरा क्रमांक पटकावला..
अंगणवाडीतील बालकांसाठी घेतलेली मेहनत व प्रबोधनात्मक सेवा कार्य याची उल्लेखनीय कामकाजाची दरवळ घेऊन बाल विकास प्रकल्प अधिकारी (देवरूख) श्री. विनोदकुमार शिंदे यांनी यावेळी सेविका सौ.पल्लवी सचिन शेरे व मदतनीस सौ. शीतल दिनेश अंब्रे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा केली आहे यामध्ये सुपरवायजर सौ . आर. आर. प्रभुघाटे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने सेविका सौ पल्लवी सचिन शेरे व सौ शीतल दिनेश अंब्रे यांनी सांगितले व मान्यवरांचे आभार मानले.