GRAMIN SEARCH BANNER

दापोली : मुरुड समुद्र किनाऱ्यावर वाहून आला पुठ्ठ्याचा रोल

Gramin Search
4 Views

दापोली: दापोलीच्या कर्दे व मुरुड समुद्रकिनाऱ्यावर समुद्रातून पुठ्ठ्याचा रोल वाहून आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
दापोलीच्या कर्दे व मुरुड येथील समुद्रकिनारी अनेक पुठ्ठ्याचे मोठाले रोल वाहून आलेले रविवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनात आले. पुठ्ठ्याच्या वेष्टनात यामध्ये काय आहे हे स्पष्ट होत नसल्याने ग्रामस्थांनी ही घटना तात्काळ पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर गोलाकार वस्तू काय आहे याची पाहणी केली असता हे पुठ्ठ्याचे रोल असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. मात्र एवढे मोठे पुठ्ठ्याचे रोल समुद्रामध्ये कुठून वाहून आले याबाबत काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पोलिसांनी यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा निर्वाळा ग्रामस्थांना दिल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Total Visitor Counter

2649908
Share This Article