चिपळूण : तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील शालीन रेसिडेन्सीमध्ये २२ जुलै रोजी दिवसाढवळ्या एका बंद घरात घरफोडी झाली आहे. अज्ञात चोरट्याने खिडकीतून घरात प्रवेश करून बेडरुममध्ये ठेवलेली ११,५०० रुपये रोख रक्कम चोरून नेली. या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळी खुर्द येथील शालीन रेसिडेन्सीमध्ये रूम क्रमांक ५, अ विंग येथे राहणाऱ्या काशिफा चंद शिकलगार (वय २७, शिक्षण एम.एस्सी. फॉर्म, व्यवसाय: नोकरी, प्रा. सेंटर दादर चिपळूण) यांच्या घरी हा प्रकार घडला. काशिफा शिकलगार या मूळच्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील समर्थ कॉलनी, सैदापूर येथील रहिवासी आहेत.
मंगळवारी सकाळी ०८.३० ते सायंकाळी ०६.०० वाजण्याच्या दरम्यान काशिफा शिकलगार यांचे घर बंद असताना, अज्ञात चोरट्याने किचनमधील खिडकीतून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममध्ये ठेवलेल्या पर्समधील ११,५०० रुपयांची रोख रक्कम चोरून तो पसार झाला. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यावर दाखल केला आहे.
चिपळूणमध्ये पुन्हा घरफोडी ; रोकड लंपास
