GRAMIN SEARCH BANNER

‘फाळणी दु:खद स्मृतीदिन’ जिल्हाधिकारी कार्यालयात डिजीटल प्रदर्शन

रत्नागिरी :  14 ऑगस्ट 1947  मध्ये भारताच्या फाळणी दरम्यान लाखो लोकांनी अनुभवलेल्या दु:ख, आघात व विस्थापनाचे स्मरण करण्यासाठी फाळणी दु:खद दिन 14 ऑगस्टला रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात तत्कालीन प्रसंगाविषयीचे प्रदर्शन डिजिटल स्वरुपात करण्यात आले.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हर्षलता गेडाम यांच्यासह विविध शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. केंद्र शासनाकडील संस्कृती मंत्रालय विभागामार्फत याबाबत 7 ऑगस्ट रोजी अर्धशासकीय पत्रान्वये कळविण्यात आले होते. ‘फाळणी दु:खद स्मृतीदिन’ निमित्त फाळणीच्या प्रचंड मानवी नुकसानाची आठवण करुन देतो आणि शांतता, एकता आणि सलोखा या मुल्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश ठेवतो. संस्कृती मंत्रालय देशभरात अर्थपूर्ण आणि सहभागी उपक्रमाद्वारे हा दिवस साजरा करत आहे. भारत सरकारने गेल्या 3 वर्षात राष्ट्रीय चर्चासत्रे, प्रदर्शन, चित्रपटाचे प्रदर्शन, मुकमोर्चा आणि वाचलेल्यांच्या संवाद सत्रांसारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये उत्साह सार्वजनिक सहभाग दिसून आला आहे.

Total Visitor Counter

2475011
Share This Article