प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भ्रमणध्वनीवरून केले ताठरे यांच्या निर्णयाचे कौतुक
सचिन यादव / धामणी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले होते.अशाच एका ठिकाणी संगमेश्वर भाजपचे सरचिटणीस डॉ.अमित ताठरे यांनी प्रशांत रानडे यांच्या सोबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माखजन नंबर १ या शाळेत मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस साजरा केला.त्याच शाळेतील दोन विद्यार्थ्यांनींची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे,त्यांच्या डोक्यावरील पितृत्वाचे छत्र हरपले आहे असे समजताच त्यांनी त्या दोन मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
यावेळी बोलताना डॉ.ताठरे यांनी सांगितले की,आजपासून पुढिल एक वर्षांकरिता या दोन विद्यार्थींनीची जबाबदारी संपूर्णपणे मी स्विकारल्याचे नमूद करतो आणि इथून पुढे या दोन विद्यार्थींनीची जबाबदारी संपूर्णपणे माझ्यावर आहे. त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य,आरोग्य सुविधा, जिवनावश्यक साहित्य अन्य काही मदत लागली तर मी देणार असल्याचे डॉ.ताठरे यांनी सांगितले.
डॉ.ताठरे यांच्या या दायीत्वाचे खूद्द प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून कौतुक केले आहे. ते विद्यार्थी ना त्या शिक्षकांच्या नातेसंबंधातील ना मित्र परिवारातील ना कुटुंबीयांतील सदस्य.वास्तविक शाळेत प्रवेश केल्यानंतर त्या मुलांचा त्यांचा संबंध आला.गरजू आणि गरीब मुलांतील टँलेंट शोधून कुणी त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं तर कुणी वर्षानुवर्षे अशा मुलांची शैक्षणिक वाटचाल सुलभ बनावी, गरीब कुटुंबीयांत शिक्षणाचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून त्यांच्या अपरोक्ष आर्थिक हातभार लावतात. सामान्य कुटुंबातील मुलांच्या जीवनात सुखकर्ता ठरलेल्या समाजातील दानशूर व्यक्ती, शिक्षक, प्राध्यापकांची ही प्रातिनिधीक ओळख.आयुष्यभर ज्ञानार्जनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचे देखील आभार मानले.
यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा सौ. शितल दिंडे, सौ.वैष्णवी चव्हाण, जयराम गोटेकर, बूथ अध्यक्ष जितू चव्हाण, शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.