चिपळूण : नायशी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सरपंच रुतीका जाधव व उपसरपंच संदीप घाग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी माजी सरपंच समीक्षा घाग, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र राक्षे यांसह मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात ५० महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली पांडे यांनी तपासण्या केल्या. २५ महिला रुग्णांची विविध रक्ततपासण्या, तसेच २० ग्रामस्थांचे शासनाचे ‘आयुष्यमान कार्ड’ काढून देण्यात आले. किशोरवयीन मुलींचीही तपासणी करण्यात आली.
शुगर, रक्तदाब, कॅन्सर, एचबी, सीबीसी, बीएसएल, आरएफटी, एलएफटी, सीए-१२५, टी३, टी४, टीएसएच अशा खर्चिक तपासण्या देखील मोफत पार पडल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली पांडे यांच्यासह आरोग्य निरीक्षक विनय डोईफोडे, समुदाय आरोग्य अधिकारी ऐश्वर्या उदापुरे, आरोग्य सेविका शालिनी पाटील, डाटा ऑपरेटर आदिती मराठे, लॅब टेक्निशियन पल्लवी डोंगरे, आशा कार्यकर्ती ममता गोसावी, आरोग्य सेवक दीपक लिंगायत, तसेच अंगणवाडी सेविका तैसिर मुल्लाजी यांनी मेहनत घेतली. ग्रामपंचायतीतर्फे सर्वांचे सत्कार करण्यात आले.
ग्रामपंचायत कर्मचारी, जीवक जाधव, समाजसेवक रवींद्र जाधव, हर्षल घाग, सचिन घाग आणि आरोग्य विभागातील तैसिर मुल्लाजी यांनी विशेष परिश्रम घेतल्यामुळे शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नायशी ग्रामपंचायतीत ‘नारी सशक्त परिवार अभियान’ आरोग्य शिबीर
