GRAMIN SEARCH BANNER

लाडकी बहीण योजनेमधील 26.34 लाख लाभार्थी अपात्र

Gramin Varta
17 Views

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांपैकी काहीजण एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत आहेत. काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी आहेत, तर काही ठिकाणी पुरुषांनीही अर्ज केल्याचे समोर आले आहे.

या सर्व 26.34 लाख अपात्र लाभार्थींना जूनपासून योजनेचा लाभ घेण्यास स्थगिती दिल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तसेच, पात्र असलेल्या 2.25 कोटी लाभार्थ्यांना जूनचा सन्मान निधी वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असूनही योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. यातील लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याते निदर्शनास आले आहे. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.

माहितीची शहानिशा जिल्हाधिकारी करणार

तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सोबतच सरकारची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणार्‍या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Total Visitor Counter

3199498
Share This Article