खेड : भरणे येथील काळकाई मंदिरासमोर दारूच्या नशेत आढळलेल्या दोघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर संभाजी पवार (वय २९) आणि संभाजी लक्ष्मण पवार (वय ५२, दोघेही रा. भरणे-गणेशनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
भरणेनाका येथून ‘११२’ नंबरवर आलेल्या कॉलनंतर पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, दोघेही दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडमध्ये दारूच्या नशेत आढळलेल्या दोघांवर गुन्हा
