संगमेश्वर : कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली येथे शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय १४ व १९ वर्षे वयोगटातील मुलं-मुलींच्या पावसाळी मैदानी क्रीडा स्पर्धेत नवजीवन विद्यालय, फुणगूस येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हा स्तरासाठी आपली छाप पाडली.
जिल्हा स्पर्धेसाठी निवड
कु. आदित्य मंगेश गोताड – २०० मीटर धावणे, द्वितीय क्रमांक
इतर विजेते विद्यार्थी
कु. दुर्वेश चंद्रशेखर मेस्त्री – ६०० मीटर धावणे, तृतीय क्रमांक
कु. वेदिका विश्वास बाचिम – ४०० मीटर धावणे, तृतीय क्रमांक
कु. गायत्री संदीप मुंडेकर – २०० मीटर धावणे, तृतीय क्रमांक
रीले स्पर्धा निकाल
४×१०० मीटर (मुली) – तृतीय क्रमांक : गायत्री मुंडेकर, वेदिका बाचिम, सिद्धी निकम, मृण्मयी खोले, संस्कृती सावंत
४×१०० मीटर (मुलगे) – चौथा क्रमांक : दुर्वेश मेस्त्री, ओम थुळ, अर्णव देवळेकर, राज शितप, सोहम शिंदे
तसेच विधी लोगडे, सई जुवळे आणि शंभव पांचाळ यांनीही स्पर्धेत सहभाग घेऊन आपली कामगिरी पूर्ण केली.
या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण आहे. मुख्याध्यापक श्री. सुनिल पाटील, संस्था अध्यक्ष श्री. चंदुभाई देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. अरुण डिंगणकर, सचिव श्री. दिलीप कुळकर्णी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत नवजीवन विद्यालय फुणगूसची चमक
