देवरूख : रत्नागिरी कोल्हापुर महामार्गावरील आंबा घाटातील दख्खन येथे शुक्रवारी रात्री 1. 30 वाजता दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. दख्खन गावच्या नळपाणी योजनचे पाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याने पिण्याया पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून एकेरी वाहतुक सुरू आहे. शनिवारी दरड हटवण्याचे काम दिवसभर सुरू होते. तोपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होती.
आंबा घाटात रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सुरूंग लावण्याबरोबरच डोंगरी कटाई करण्यात आली आहे. मार्गाच्या वरच्या बाजूने कटिंग केलेल्या डोंगराला भेगा गेल्या असून ती माती खाली येण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातच दख्खन येथे शुक्रवारी रात्री 1.30 वाजता मोठी दरड खाली कोसळली. याची माहिती महामार्ग विभागाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजुला करण्यास सुरूवात झाली. दीड तासाने दरडीचा काहीसा भाग मोकळा करण्यात यश आले. दीड तासानंतर खोळंबलेली वाहतुक पुर्ववत झाली.
आंबा घाटात घाटात कोसळलेली दरड हटवली; वाहतूक दीड तास होती ठप्प

Leave a Comment