चिपळूण: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चिपळूण शहरातील राजकारणात एक महत्त्वाचा बदल घडवत श्री. उदय संभाजी ओतारी यांची बेसिक शहर कार्याध्यक्षपदी एकमुखी निवड केली आहे. यासोबतच त्यांना चिपळूण तालुका महायुती समन्वयक पदाचीही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चिपळूणचे आमदार शेखर सर निकम यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या निवडीच्या वेळी प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम, प्रदेश महिला उपाध्यक्षा पूजा निकम, जिल्हा कार्याध्यक्षा रेहाना बिजले, तालुका अध्यक्ष नितीन उर्फ अबू ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद शेठ कापडी, ज्येष्ठ नेते दादा साळवी, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव कदम, माजी नगरसेवक किशोर रेडीज, सुरूशेठ खेतले, सुरेशशेठ खापले, पांडूशेठ माळी, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर, बेसिक शहर सरचिटणीस मनोज जाधव, अनिलकुमार जोशी, महिला क्षेत्राध्यक्षा मनाली जाधव, महिला तालुकाध्यक्षा जागृती शिंदे, माजी सभापती रिया कांबळी, मीनल काणेकर, शहर महिला अध्यक्षा आदिती देशपांडे, पूनम भोजने, पूर्वा आयरे, महिला जिल्हा उपाध्यक्ष रविना गुजर, युवक जिल्हाध्यक्ष अजिंक्य आंब्रे, तालुकाध्यक्ष निलेश कदम, शहर युवक अध्यक्ष योगेश पवार, प्रसन्न आवले, सिद्धेश लाड, आल्हाद यादव, इम्रान खतीब, जाहिर कुंडलिक, प्रभाकर सैतावडेकर, सलीम पालोजी, दादू गुढेकर, रुपेश इंगवले, राजेश कदम, अमित कदम, विलास सकपाळ, राजा चव्हाण, राजू सुतार, रमेश वरेकर, जमालुद्दीन बंदरकर, जितू फुटक, अमित जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उदय ओतारी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी यापूर्वी विद्यार्थी तालुकाध्यक्ष, युवक शहराध्यक्ष, आणि बेसिक शहराध्यक्ष यांसारख्या विविध पदांवर यशस्वीपणे काम केले आहे. त्यांची कामाची विशिष्ट शैली आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याची त्यांची क्षमता यामुळे ते पक्षाचे एक खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आमदार शेखर निकम यांचे ते अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात. विशेषतः विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी महायुतीतील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्तम समन्वय साधून पक्षाच्या यशात मोलाची भूमिका बजावली होती.
या जबाबदारीची एकमुखी निवड ही त्यांच्या दीर्घकाळच्या कार्यशैलीचा आणि पक्षनिष्ठेचा सन्मान असल्याचे मानले जात आहे. या निवडीबद्दल बोलताना श्री. ओतारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “ही जबाबदारी माझ्यासाठी अत्यंत गौरवाची आहे. मी पक्षातील सर्व ज्येष्ठ, आजी-माजी पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते आणि जनतेचा सन्मान राखून काम करेन. आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये समन्वयाने कार्य करून पक्ष आणि महायुतीच्या यशासाठी माझे संपूर्ण कौशल्य पणाला लावीन.” ओतारींच्या या निवडीमुळे चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला नवचैतन्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.