रॉयल चेस अकॅडमी यांच्यावतीने आयोजन, आकर्षक बक्षिसे आणि ट्रॉफ्यांचे वितरण
राजापूर | प्रतिनिधी
राजापूर रॉयल चेस अकॅडमी यांच्या वतीने राजापूर तालुका चेस चॅम्पियनशिप २०२५ या भव्य खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता एस.एस. क्लासेस, धोपेश्वर घाटी, राजापूर येथे होणार आहे.
या स्पर्धेत स्विस लीग ७ राऊंड पद्धतीने खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची वेळ मर्यादा १५ मिनिटे + ५ सेकंद प्रति खेळाडू अशी असणार आहे.
या स्पर्धेसाठी ₹१५,०००/- रुपयांचा भव्य प्राईज फंड, आकर्षक ट्रॉफी व पदके, तसेच इतर बक्षिसांचे वितरण सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
बक्षिसांची माहिती:
प्रथम क्रमांक : ₹२०००/-
द्वितीय क्रमांक : ₹१५००/-
तृतीय क्रमांक : ₹१०००/-
चौथा ते दहावा क्रमांक : अनुक्रमे ₹८००/- ते ₹२००/- व पदके
वयोगट विशेष:
९/११/१३ वर्षे वयोगटातील मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र बक्षिसे:
◼️प्रथम : ₹३००/- व ट्रॉफी
◼️द्वितीय : ₹२००/- व पदक
◼️तृतीय : ₹१००/- व पदक
तसेच उत्कृष्ट महिला खेळाडू व उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडूसाठी ₹३००/- रोख बक्षिसे व ट्रॉफी दिली जाणार आहेत.
◼️प्रवेश फी : ₹१००/-
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी मोहसिन सय्यद (संपर्क: ९८२३८२१२८८) यांच्याशी संपर्क साधावा.
राजापूर तालुक्यातील तसेच राजापूर शहरातील मुलांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने माजी नगराध्यक्ष अँड. जमीर खलिफे यांच्या प्रयत्नातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी नगराध्यक्ष ऍड जमीर खलिफे यांच्यातर्फे 10 ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
