विनायक सावंत/सावर्डे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला उपाध्यक्ष व पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पूजाताई निकम तसेच चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजमाने साहेब यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपत सावर्डे येथील श्री देव केदारनाथ मंदिर परिसरात वन महोत्सव साजरा करत वृक्ष लागवड उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात वृक्षारोपण करण्यात आले. प्रमुख उपस्थितांमध्ये श्री. राजमाने साहेब, सौ. पूजाताई निकम, वनविभागाच्या एसीएफ माननीय लगड मॅडम, सावर्डेच्या सरपंच बागवे मॅडम, माजी सरपंच व विद्यमान सदस्य सुभाष मोहिरे, माजी सरपंच व संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष शौकत भाई माखजनकर, सूर्यकांत चव्हाण, देवराज गरगटे, डॉ. कृष्णकांत पाटील, डॉ. वर्षा खानविलकर, डॉ. रश्मी पाटील, पंचायत समिती व ग्रामपंचायत अधिकारी, तसेच सावर्डे येथील महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्या, वनविभागाचे कर्मचारी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने असा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून, सामाजिक कार्य आणि पर्यावरण रक्षण यांचा समतोल साधणारी ही कृती कौतुकास्पद आहे.