GRAMIN SEARCH BANNER

रत्नदुर्गवरील तरुणी आत्महत्या प्रकरणात तरुणाने दिला जबाब; यापूर्वीही तिने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

तिने कॉल केला तेव्हा तो मैत्रिणीसोबत….

रत्नागिरी : “ऑक्टोबर २०२४ पासून मी आणि सुखप्रीत हिच्यात वाद सुरू झाले. त्यानंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी २०२५ मध्येही ती मला भेटण्यासाठी रत्नागिरीत आली होती. तेव्हा आमच्यात वाद झाल्यामुळे तिने आत्महत्येच्या उद्देशाने औषध घेतले होते. तिला हॉस्पिटलला दाखल केले होते. आमच्यात सतत वाद होऊ लागल्याने गेल्या चार महिन्यांपासून तिचा नंबर मी ब्लॉक केला आहे. मी सध्या दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे”, असा जबाब जसमिक सिंग याने दिल्याचे सुखप्रीतच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

सुखप्रीतचे वडील प्रकाशसिंग धालिवाल ३ जुलैला मुलीच्या शोधासाठी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी जसमिक सिंग याला बोलावून घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो म्हणाला, सुखप्रीत आम्ही दोघे बँकिंग ट्रेनिंगमध्ये मणिपाल येथे पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी आमची ओळख होऊन मैत्री झाली. त्यानंतर आमच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. सुखप्रीत ही मला भेटण्यासाठी रत्नागिरीलादेखील यायची. मात्र, ऑक्टोबर २०२४ पासून आमच्यात वाद सुरू झाला. त्यानंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी २०२५ मध्ये देखील सुखप्रीत रत्नागिरी येथे मला भेटण्यासाठी आलेली होती. त्यावेळीही आमच्यात वाद झाला तेव्हा तिने औषध घेतले होते मी सध्या दुसऱ्या मुली सोबत रिलेशनशिप मध्ये आहे त्याबाबत मी सुखप्रित हिला सांगितले होते मात्र त्यानंतरही ती रत्नागिरी आली होती तिने मला कॉल केला तेव्हा मी माझ्या मैत्रिणी सोबत बाहेर फिरायला गेलो होतो.

तिला मी तू परत निघून जा असे सांगितले मी जेव्हा परत आलो त्यावेळी तिची बॅग माझ्या दरवाजाजवळ होती तिला फोन केला असता तिचा फोन लागला नाही तिने ज्या नंबर वरून कॉल केला त्या माणसाला कॉल करून माहिती घेतली तर तिने भगवती बंद शिवसृष्टी येथून कॉल केल्याचे समजले मी तिकडे जाऊन खात्री केली असता ती मिळून आली नाही अशी हकीकत जसमिक सिंग यांनी पोलिसांना दिली.

Total Visitor

0217279
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *