GRAMIN SEARCH BANNER

माथेरानमध्ये भीषण अपघात, फिरायला आलेल्या पर्यटकांची थार रेलिंग तोडून थेट खड्ड्यात

रायगड: रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे माथेरान गिरीस्थान याला महाराष्ट्रा सहित देश- विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. काही दिवसांपूर्वी माथेरान येथे जाणाऱ्या पर्यटकांची एक गाडी रेलिंग तोडून काही अंतरावर खाली जाऊन अडकली होती.

त्याच प्रकारची घटना आज दिनांक 6 जुलै 2025 रोजी सकाळी घडल्याची माहिती आहे. गुजरात येथून आलेल्या पर्यटकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून या गाडीमध्ये असणारे चार पर्यटक हे बालंबाल बचावले आहेत.

माथेरानला आलेल्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात

रविवारच्या विकेंडच्या सुट्टी आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी माथेरानच्या थंड हवामानात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हिरवळीच्या निसर्गरम्य परिसरात फेसाळणारे धबधबे आणि डोंगरदऱ्यांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एका गाडीला रविवारी (6 जुलै) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. गुजरात क्रमांकाची ‘थार’ (GJ 01 MU 2389) ही कार माथेरान घाटात चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट खड्ड्यात कोसळली. या भीषण दुर्घटनेत चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून मोठी जीवितहानी टळली आहे.

जुमापट्टी रेल्वे स्थानकाच्या वरच्या पहिल्या रेल्वे क्रॉसिंगजवळ वळणावर ही घटना घडल्याची माहिती आहे. एक स्कुटी चालवत असलेल्या महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली लोखंडी रेलिंग तोडून ही गाडी थेट खड्ड्यात जाऊन पडली. सुदैवाने कारमधील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

अपघातग्रस्त पर्यटक अहमदाबाद येथून आले होते. त्यांच्या मित्रांचा दुसरा गट दुसऱ्या कारमध्ये होता. अपघातग्रस्त ‘थार’ कारला टोईंग करून बाहेर काढण्यात आल्याने वाहतुकीचा अडथळा दूर झाला. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताने परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

Total Visitor

0217844
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *