GRAMIN SEARCH BANNER

तक्षशिला पतसंस्थेच्या सभासदांना ९ टक्के लाभांश : अध्यक्ष नितीन कांबळे

Gramin Varta
133 Views

पाली : संस्थेप्रती सभासदांनी दाखविलेला दृढ विश्वास हाच संस्थेसाठी फार मोलाचा आहे त्यामुळेच आपण संस्थेची चौथी शाखा यशस्वीपणे सुरू करून दाखवू शकलो आहे.  तसेच सभासदांना सन २०२४ ते २०२५ या आर्थिक वर्षांकरिता ९% लाभांश संस्थेने जाहीर केला आहे असे  अध्यक्ष नितीन कांबळे यांनी सांगितले.

पाली येथे मुख्यालय असलेल्या तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पाली येथे  संपन्न झाली. यावेळी सभासदांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या सभेकरिता अध्यक्ष नितीन कांबळे,उपाध्यक्ष अमोल सावंत,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण गुरव, संचालक कृणाल सरफरे,आनंद मोहिते, पराग पालकर,अजिंक्य सुर्वे, गणपत सनगरे,संदीप पाटील,सुमित रणसे,स्नेहा गराटे,वैभवी सावंत,दत्ताराम घडशी,कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सुदेश कांबळे, विद्याधर कांबळे,मारुती घोरपडे या मान्यवरांनी संस्थेच्या प्रगती बाबत कौतुक केले. तसेच पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

या पतसंस्थेने २५ वर्षात तब्बल १० हजार सभासदांचा टप्पा ओलांडला आहे. ठेवींचा १८कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या आर्थिक वर्षात ५० कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ,बँको ब्लू रिबन,आदर्श पतसंस्था या तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी तक्षशिलाला यापूर्वीच गौरवण्यात आले आहे.  त्याचसोबत संस्थेचे वाढते सभासद,भागभांडवल,ठेवी, गुंतवणूक, कर्जे, खेळते भांडवल यामध्ये झालेली भरघोस वाढ, सहकार खात्याचे सी. डी. रेशो, सी आर आर.,एस एल आर. चे आदर्श प्रमाण संस्थेने वेळोवेळी राखलेले आहे. सातत्याने ऑडीट वर्ग “अ” हा कायम ठेवला आहे. संस्थेने संस्थेने अत्याधुनिक सोयीसुविधा ग्राहकांच्या सेवेत दिल्या आहेत.ग्राहकांसाठी विविध योजना,बचतठेव,ग्रामीण भागात ग्राहकांसाठी विविध सुविधा,एटीएम,अधिकृत वीज भरणा, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस,एस.एम.एस. बँकिंग,क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

स्पर्धेच्या युगात सहकार क्षेत्रात टिकून राहण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असतानाच केवळ शिस्त, सभासदांबरोबरच समाजाप्रती असलेली उत्तर दायित्वाची भावना या जोरावरच “तक्षशिला” ने हा मोठा टप्पा पार केला आहे. त्यामुळेच पतसंस्थेच्या कार्याची दखल अगदी राज्य पातळीपर्यंत घेतली जात आहे.

सहकार क्षेत्रातील उत्तम कामगिरी करिता संस्थेला पालकमंत्री उदय सामंत,आ. किरण सामंत,उद्योजक रविंद्र सामंत, र.जि.म.बँकेचे संचालक रामभाऊ गराटे,आबा टिळेकर,पाली सरपंच विठ्ठल सावंत,नाणीज सरपंच विनायक शिवगण व संस्थेचे सभासद हितचिंतक व ठेवीदार यांच्याकडून व परिसरातून संस्थेला मार्गदर्शन व सहकार्य लाभते आहे.

Total Visitor Counter

2650413
Share This Article