GRAMIN SEARCH BANNER

लांजा बाजारपेठेत मटका जुगारावर पोलिसांचा छापा; एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
202 Views

लांजा: लांजा बाजारपेठेतील गोंडेसखल रोड परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर लांजा पोलिसांनी धाड टाकून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी, २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास एका बंद टपरीच्या आडोशाला करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लांजा बौद्धवाडी येथील रहिवासी राजन गजानन कांबळे (वय ४७) हा गॉडेसखल रोडवरील एका बंद टपरीच्या बाजूला स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारून कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल विकास सोपान पवार यांनी या ठिकाणी छापा टाकला असता, संशयित आरोपी जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह रंगेहाथ मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ४२५ रुपयांची रोख रक्कम आणि इतर जुगार साहित्य असा एकूण ४२७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात संशयित राजन कांबळे विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3199515
Share This Article