रत्नागिरीच्या माजी जिल्हा परिषद सीईओवर सोशल मीडियावर टीका
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात शेतकरी अडचणीत असताना जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यग्र असल्याचे दिसून आले आहे.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीसह आणि धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी कलावंतासह नृत्य केले.
जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका कार्यक्रमात बुधवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केला. जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याने नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकारी जोरदार ट्रोल झाले.
धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे पूर आला. संपूर्ण जिल्ह्यामधील शेतकरी आणि नागरिक संकटामध्ये आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लातूर आणि सोलापूर येथील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनीही भूम, वाशी आणि इतर पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसान भरपाईचा अंदाज घेतला. अजूनही या जिल्ह्यावर वरुणराजाची अवकृपा असल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर येथे आयोजित केलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आपल्या पत्नीसह आणि धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कलावंतासह डान्स केला. एकीकडे मराठी जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिक पुरासारख्या संकटामध्ये असताना जिल्हाधिकारी यांनी ही आपली त्यांच्या प्रति असलेली असंवेदना दाखवून दिली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काहींनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली. लोककलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचा काहींचा दावा आहे.