पाली : विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यावसायिक शिक्षणाचे धडे मिळावेत या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणीज क्र.१ मध्ये सलग तिसऱ्या वर्षी विद्यार्थी वस्तूभांडारचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी नाणीजचे सरपंच विनायक शिवगण,माजी सरपंच दत्ताराम शिवगण,खानू केंद्राचे केंद्र प्रमुख गोविंद तारवे सर ,नाणीजचे पोलीस पाटील नितीन कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष दत्ताराम खावडकर,सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दिलीप भागवत,शा. व्य.स.अध्यक्षा निशा बेंडल, उपाध्यक्ष श्रीराम दाणी,अनिल खावडकर यांसह पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यावसायिक शिक्षण मिळावे , खरेदी विक्री,नफा – तोटा यांचे ज्ञान व्हावे शैक्षणिक साहित्य शाळेतच बाजारभावापेक्षा कमी किंमतीत मिळावे या हेतूने मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपशिक्षक मनोजकुमार खानविलकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शाळेत सलग तिसऱ्या वर्षी सुरू करण्यात आला आहे. सदर वस्तूभांडार शाळेतील चौथीचे विद्यार्थी चालवतात. विद्यार्थ्यांना व्यावसायिक व व्यावहारिक ज्ञान मिळावे म्हणून सुरू केलेल्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.
फोटो ओळी- नाणीज शाळा क्र. १ मध्ये विद्यार्थी वस्तूभांडारचा शुभारंभ करताना केंद्रप्रमुख गोविंद तारवे,दिलीप भागवत, नितीन कांबळे व मान्यवर.