GRAMIN SEARCH BANNER

लांजावासियांना आता मिळणार कोल्हापूरच्या ‘चुलीवरील फरसाण’ची खमंग चव

Gramin Varta
600 Views

४० व्या शाखेचे आज नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

लांजा /अरबाज नेवरेकर :- लांजा शहरात कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध ‘चुलीवरील फरसाण’ या व्यवसायाची नवी शाखा सुरू होत असून, या शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. महाराष्ट्रातील अनेक गौरव पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या या ब्रँडची ही ४० वी शाखा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
गुरुवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नगरपंचायत लांजा यांच्या नगराध्यक्ष मा. सौ. सावली कुरूप उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून उपनगराध्यक्ष मा. श्री. बाबा लांजेकर, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. जयवंत भाऊ शेटये आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. प्रसन्न शेटये हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा उपक्रम सौ. सुप्रिया अनिल कांबळे आणि सौ. पल्लवी शैलेश कोळवणकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. लांजा शहरातील हिना मार्बल शेजारी, मुंबई-गोवा महामार्गावर ही नवीन शाखा सुरू होत आहे

Total Visitor Counter

3353995
Share This Article