GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत भरदिवसा दुचाकी चोरी, चोरटा सीसीटीव्हीत कैद

Gramin Varta
119 Views

दापोली : शहरातील कामगार गल्ली परिसरात भरदिवसा दुचाकी चोरीची घटना घडल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खुशी फॅशन हाऊससमोर उभी असलेली स्पेंडर कंपनीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

सदर दुचाकी खुशी फॅशन हाऊसमध्ये कार्यरत असलेल्या सचिन कांगणे यांची आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी दुकानासमोर दुचाकी उभी करून कामावर हजेरी लावली होती. मात्र काही वेळातच संधी साधून चोरट्याने दुचाकी घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, त्यामध्ये चोरट्याची हालचाल आणि चोरीची पद्धत दिसून येत आहे.

घटनेची माहिती मिळताच दुचाकी मालकाने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला असून, चोरीस गेलेल्या दुचाकीचा क्रमांक MH 08 U 0574 असा आहे.

भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, चोरीस गेलेली दुचाकी किंवा संशयित व्यक्तीबाबत कोणालाही माहिती असल्यास ७४४७२ ११६२२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3072836
Share This Article