GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे येथे दोन पिकअपची समोरासमोर धडक; चालक गंभीर जखमी

Gramin Varta
155 Views

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील तळेकांटे येथील बावनदी पुलाजवळ गुरुवारी रात्री दोन बोलेरो पिकअप गाड्यांचा भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने समोरून येणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

ही घटना १४ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. महामार्गावर एका बाजूने वाहतूक सुरू असताना आशिष प्रदीप खरसे हा चालक पिकअप घेऊन रॉंग साईडने भरधाव जात होता.

याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या बोलेरो पिकअपला त्याने जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.

या अपघातात दुसऱ्या वाहनाचा चालक चंद्रशेखर तारासिंग जाधव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच राज जाधव यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3388620
Share This Article