अधिकाऱ्यांनी कामात कसूर करु नये- ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम
रत्नागिरी– शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळायला हवा. अधिकाऱ्यांनी कामात अजिबात कसूर करु नये. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, आन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला.
दापोली तालुक्यातील देगाव येथे आज विविध शासकीय योजना अंमलबजावणी आढावा बैठक घेतली.
आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी डाॕ विजय सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी आधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसीलदार अर्चना बोंबे, पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, तालुका प्रमुख उन्मेष राजे, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, ममता शिंदे, प्रकाश कालेकर, अनंत करबेले, प्रभाकर गोलांबडे, विश्वास खांबे आदी उपस्थित होते.
महावितरण, टेलिफोन, सार्वजनिक बांधकाम, पोस्ट ऑफिस, कृषी विभाग, महसूल विभाग आदी विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी विविध प्रश्न विचारले.
यावेळी शासकीय विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.