GRAMIN SEARCH BANNER

लांजा – राजापूर नगरपंचायतींना आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून ५ कोटींचा विकासनिधी मंजूर

Gramin Varta
402 Views

सिकंदर फरास / लांजा

लांजा आणि राजापूर नगरपंचायतींच्या विविध विकासकामांना आता गती मिळणार आहे. आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने दोन्ही नगरपंचायतींसाठी तब्बल ५ कोटी रुपयांच्या विकासनिधीस मंजुरी दिली आहे. हा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे.

या निधीतून रस्ते काँक्रीटीकरण, गटारी बांधकाम, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, स्मशानभूमीचे विकासकाम, सार्वजनिक स्वच्छता आणि प्रकाशयोजना अशा मूलभूत सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत.

आमदार किरण सामंत यांनी सांगितले की, “लांजा आणि राजापूर नगरपंचायतींचा सर्वांगीण विकास हा माझा प्राधान्यक्रम आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी आणखी निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू राहील.”

नगरपंचायतींचे अधिकारी, स्थानिक जनप्रतिनिधी आणि नागरिकांनी या मंजुरीबद्दल समाधान व्यक्त करत आमदार किरण सामंत यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे लांजा आणि राजापूर शहरातील नागरी विकासाला मोठी गती मिळणार आहे.

Total Visitor Counter

3366874
Share This Article