GRAMIN SEARCH BANNER

मंडणगडमध्ये बॉक्साईटची वाहतूक करणारा डंपर पलटी

Gramin Varta
116 Views

मंडणगड : मांदीवली–चिंचघर मार्गावर बॉक्साईटची वाहतूक करणारा एक डंपर गावारी येथे उलटून अपघात झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या मार्गावरील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

मांदीवली आणि चिंचघर या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावरून सध्या सुमारे ४० टन वजनाचे बॉक्साईट भरलेले डंपर धाव घेत आहेत. प्रत्यक्षात हा पूल आणि परिसरातील अरुंद रस्ता एवढ्या क्षमतेच्या अवजड वाहनांसाठी योग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सातत्याने सुरू असलेल्या या धोकादायक वाहतुकीबाबत ग्रामस्थांनी विविध विभागांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. गावारी येथे डंपर उलटल्याच्या घटनेनंतर या मार्गावरील धोक्याची तीव्रता स्पष्ट झाली असून, अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तातडीने कठोर निर्बंध घालावेत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Total Visitor Counter

3366926
Share This Article