तरवळ/अमित जाधव : रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथील जिल्हा परिषद शाळा माचीवलेवाडी, मायंगडेवाडी व केंद्रीय शाळा तरवळ नंबर १ मध्ये राज्याचे उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या वतीने स्थानिक कार्यकर्त्यांच्या हस्ते मोफत छत्र्या वाटप कार्यक्रम दिनांक १७ जुलै रोजी केंद्रीय शाळा तरवळ नंबर १ येथे पार पडला.मुलांना पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित शाळेत जाता , येता यावे यासाठी या छत्र्या देण्यात आल्या आहेत.
या मोफत छत्री वाटप कार्यक्रमाला उपस्थित युवा सेना विभाग प्रमुख नंदकुमार कुवार, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र कुळ्ये, जनार्दन कुळ्ये, गाव प्रमुख महादेव कुळ्ये, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन कुळ्ये, तुकाराम कुळ्ये, राजन कुळ्ये, तसेच शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टीप: तरवळ येथे शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्या वाटप करताना युवा सेना विभाग प्रमुख नंदकुमार कुवार, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन कुळ्ये, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र कुळ्ये, राजन कुळ्ये, तुकाराम कुळ्ये आणि शाळेचे शिक्षक.