GRAMIN SEARCH BANNER

महिलेशी अश्लील वर्तन करणाऱ्या संशयितावर फक्त 48 तासांत दोषारोपपत्र दाखल

नाटे सागरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

राजन लाड/जैतापूर: राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडा पेठ येथे घडलेल्या एका गुन्ह्यात नाटे सागरी पोलिसांनी अवघ्या 48 तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ही कार्यतत्परता कौतुकास्पद ठरत असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांची शून्य सहनशीलतेची भूमिका अधोरेखित झाली आहे.

25 ऑगस्ट 2025 रोजी एका महिलेकडे आरोपीने अश्लील वर्तन व शिवीगाळ केली. पीडितेच्या तक्रारीवरून नाटे सागरी पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांच्या सन्मानाशी संबंधित गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी विलंब न लावता तपास सुरू केला.

या कारवाईत मा. पोलीस अधीक्षक सो. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी स्पष्ट सूचना देऊन तपास वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तपास पथकाला जबाबदारी सोपवली.

बीट हवालदार एस. एस. इंगळे यांनी तत्परतेने पंचनामा करून आवश्यक पुरावे गोळा केले. तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस हवालदार हुजरे यांच्यासह संपूर्ण तपास पथकाने एकत्रितपणे काम करत आरोपीस ताब्यात घेतले व 48 तासांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

नाटे सागरी पोलिसांच्या या जलद व ठोस कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांकडे पोलिसांकडून किती गांभीर्याने पाहिले जाते, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे. स्थानिक नागरिकांकडून या कामगिरीचे मनापासून कौतुक होत असून, ही कारवाई इतर गुन्हेगारांसाठी धडा ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2474139
Share This Article