रत्नागिरी : फणसोप येथील ७४ वर्षीय वृद्धाचा कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १९ जून २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
वसंत उलगप्पा भिंगारे (वय ७४, रा. घर नं. ९६०, फणसोप, वांयगणी फाटा, ता.जि. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंगारे हे जिना चढत असताना तोल जाऊन पडले होते. त्यांना तात्काळ रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. रत्नागिरी शहर पोलिसांनी या घटनेची अकास्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
फणसोप येथील वृद्धाचा जिना चढताना पडून उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Comment