देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द येथील एका काजू फॅक्टरीतून १९ जून २०२५ ते २३ जून २०२५ या कालावधीत ७३ हजार रुपये किमतीच्या काजू बियांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेश शरदचंद्र जागुष्टे (वय ५५, व्यवसाय शेती/काजू फॅक्टरी, रा. ओझरे खुर्द, ता. संगमेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची काजू फॅक्टरी ओझरे खुर्द, चोरपऱ्याजवळ आहे. आरोपी विराज डाफळे (रा. सोनवडे, ता. संगमेश्वर) याने त्यांच्या काजू बिया साठवण्याच्या खोलीचे पत्र्याचे हुक काढून, पत्रा सरकवून आत प्रवेश केला. त्यानंतर उजवीकडील दरवाजाची कडी काढून, तेथून ५० किलो वजनाची १२ काजू बियांची पोती चोरून नेली.
चोरलेल्या १२ पोत्यांमधील काजू बियांची एकूण किंमत ७३,०००/- रुपये इतकी आहे.
या घटनेप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात १० जुलै रोजी विराज डाफळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
देवरुखमधील ओझरे खुर्द येथील काजू फॅक्टरीतून 12 पोती काजू बी चोरीस, ७३ हजारांचे नुकसान
