GRAMIN SEARCH BANNER

समरीन बुरोंडकर हिची भारतीय बीच कबड्डी संघासाठी संभाव्य निवड

Gramin Varta
4 Views

खेड : अनिकेत स्पोर्ट्स क्लब भरणे येथील आघाडीची खेळाडू कु. समरीन बुरोंडकर हिची भारतीय महिला बीच कबड्डी संघाच्या संभाव्य यादीमध्ये निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण खेड तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

समरीन बुरोंडकर ही गेल्या काही वर्षांपासून कबड्डी या खेळामध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. समुद्रकिनारी होणाऱ्या बीच कबड्डी प्रकारातही तिने आपली चमक दाखवली आहे. तिच्या मेहनतीला आणि कौशल्याला मिळालेली ही दाद तिच्या खेळातल्या समर्पणाचे प्रतिक आहे.

तिच्या या निवडीबद्दल खेड तालुका कबड्डी असोसिएशन तर्फे तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

तालुक्यातील युवा खेळाडूंना तिच्या यशातून प्रेरणा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. समरीन बुरोंडकरच्या या यशामुळे खेड तालुक्याचा कबड्डी नकाशावरील ठसा अधिक ठळक झाला आहे. तिची अंतिम संघामध्ये निवड होण्यासाठी सर्वजण अपेक्षेने वाट पाहत आहेत

Total Visitor Counter

2649961
Share This Article