खेड :मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी येथील कामाक्षी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी सकाळी सुमारे ११.५० च्या सुमारास इर्टिगा कार आणि दुचाकीमध्ये अपघात होऊन दोन जण जखमी झाले. जखमींना सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांच्या मदतीने तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातात नितेश नारायण जाधव (४०) आणि प्रवीण नितेश जाधव (३०, दोघेही रा. रोहा) हे जखमी झाले आहेत. इर्टिगा कार (क्र. MH 04 LM 3001) मुंबईहून खेडच्या दिशेने जात असताना ती रिव्हर्स घेत असताना रोहावरून खेडकडे येणाऱ्या दाकी (क्र. MH 06 CK 5216) या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडकेनंतर दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पुढील कारवाई सुरू केली. सायंकाळी उशिरापर्यंत इर्टिगा कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या अपघातामुळे महामार्गावरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
खेडमध्ये इर्टिगा कारची दुचाकीला धडक; दोन जण जखमी
