GRAMIN SEARCH BANNER

कोकण रेल्वे प्रशासन देश-विदेशात लवकरच राबविणार पायाभूत प्रकल्प

Gramin Varta
71 Views

नवी मुंबई : कोकण रेल्वे देश-विदेशात पायाभूत प्रकल्प राबविणार आहे. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनस् कंपनीबरोबर सोमवारी सीबीडी बेलापूर येथील मुख्यालयात यासंदर्भातील सामंजस्य करार करण्यात आला.

या करारावर कोकण रेल्वेतर्फे प्रकल्प कार्यकारी संचालक दिनेशकुमार थोप्पील आणि कंपनीतर्फे संचालन संचालक संतोष राय यांनी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा व कंपनीचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक अर्जुन धवन यांच्यासह दोन्ही संस्थांचे संचालक उपस्थित होते.

असा आहे एचसीसीसोबत करार
कराराअंतर्गत कोकण रेल्वे व हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी एकत्रितपणे भारतात तसेच विदेशात पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यासाठी सहकार्य करणार आहेत. कोकण रेल्वेने कोकण रेल्वे मार्ग, चिनाब पूल, अंजिखाड पूल यांसारखे गुंतागुंतीचे प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. तसेच संशोधन-विकास, अभियांत्रिकी क्षमता आणि देखभाल प्रकल्पांतील अनुभव या माध्यमातून कोकण रेल्वे या नव्य प्रक्रियेत योगदान देणार आहे.

हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी ही देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी व बांधकाम संस्था असून परिवहन, ऊर्जा आणि शहरी विकास क्षेत्रातील अनेक प्रकल्पांच्या अंमलबजावणीत त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. या करारामुळे आव्हानात्मक आणि उच्च मूल्याच्या प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास या दोन्ही संस्थांनी व्यक्त केला आहे.

Total Visitor Counter

2652447
Share This Article