GRAMIN SEARCH BANNER

फुणगूस ग्रामपंचायतीच्या कामकाजावर गंभीर आरोप: मुख्यमंत्र्यांच्या अभियानाकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतप्त

Gramin Varta
579 Views

संबंधितांवर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा

संगमेश्वर – रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित विशेष ग्रामसभा केवळ ‘कोरम पुर्ण नाही’ या कारणामुळे रद्द केल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले आहेत. संबंधित सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीइओ आणि पंचायत समिती संगमेश्वरकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात 22 ग्रामस्थानी सह्या केल्या आहेत.

फुणगुस ग्रामपंचायतीची ग्रामसभा 25 ऑगस्ट 2025 रोजी घेण्याचे आयोजित करण्यात आले होते. मात्र या दिवशी कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली.परंतू ती ग्रामसभा देखील अजून घेण्यात आलेली नाही त्यानंतर 17/9/25 रोजी जी विशेष ग्रामसभा झाली ती देखील कोरम करण्यात आली त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ही विशेष ग्रामसभा तहकूब करणाऱ्यांची चौकशी करावी असे निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले, फुणगुस ग्रामपंचायतीमध्ये तहकूब ग्रामसभा देखील अजून घेण्यात आलेली नाही व विशेष ग्रामसभा तहकूब करून ग्रामस्थांच्या हक्काची पायमल्ली करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या आदेशाचाही अवमान करण्यात आला आहे. ही तहकूब केलेली ग्रामसभा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 7 (3) नुसार 25/8/25 तहकूब ग्रामसभा 7 दिवसाच्या आत घेणे बंधनकारक होते. मात्र सप्टेंबर महिना संपत आला तरी घेण्यात आली नाही. 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ची विशेष ग्रामसभा घेण्याचे शासन आदेशाने बंधनकारक करण्यात आले होते. या अभियानांतर्गत सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, वनरक्षक, कृषी सहाय्यक, पशुसंवर्धक, महिला बचत गट व सर्व ग्रामसभा सदस्य उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

ग्रामसभेत 35 ते 40 ग्रामस्थ पत्यक्ष हजर असूनही ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक रमेश डडमळ यांनी कोरम पूर्ण नाही असे कारण देत ग्रामसभा तहकूब केली. काही ग्रामस्थ उशिरा आल्याने कारण पुढे करून ही सभा सुरू न करता शासन आदेशाचा अवमान आणि ग्रामस्थांच्या हक्काचा भंग केला आहे. एवढेच नव्हे तर इतर ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेची वेळ सकाळी 10 ची होती मात्र फुणगुस ग्रामपंचायतीची वेळ सकाळी 11 वाजता करण्यात करण्यात आली होती. जाणूनबुजून 11 ची वेळ देण्यात आली आणि हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामसभा न घेणे अथवा अधिकाराचा गैरवापर करणे यासाठी सरपंचावर पदच्युतची कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून ग्रामसेवक रमेश डडमळ व सरपंच अशोक पांचाळ यांच्यावर अनुशासनात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. कारवाई झाली नाही तर आम्ही ग्रामस्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Total Visitor Counter

2651779
Share This Article